मंदिरात दर्शन घेण्यासाठी तुम्हाला ‘हे’ नियम पाळावे लागणार

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मागच्या आठवडयात अनलॉकडाउन 1.0 जाहीर करत मॉल, प्रार्थनास्थळे आणि हॉटेल उघडण्यास परवानगी दिली. येत्या आठ जूनपासून काही राज्यांमध्ये मॉल, प्रार्थनास्थळे आणि हॉटेल खुली होणार आहेत.

प्रार्थनास्थळांमध्ये दर्शनासाठी गेल्यानंतर आता आपल्याला पूर्वीसारखे बिनधास्तपणे वावरता येणार नाही. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागेल. केंद्र सरकारने त्या दृष्टीने काल संध्याकाळी प्रार्थनास्थळांसाठी काही मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत.

*  प्रार्थनास्थळाच्या प्रवेशद्वारावर हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर आणि शरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मल स्क्रिनिंगची सुविधा आवश्यक आहे.

*  आजाराची कुठलीही लक्षण नसणाऱ्या तंदुरुस्त व्यक्तीलाच प्रार्थना स्थळाच्या परिसरात प्रवेश दिला जाईल.

*  चेहऱ्यावर मास्क बंधनकारक असेल. त्यांनाच प्रवेश दिला जाईल.

*  पोस्टर/स्टँण्डीच्या माध्यमातून Covid-19 चा फैलाव रोखण्याच्या उपायोजनासंदर्भात माहिती देण्यात यावी. प्रार्थनास्थळांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ठळकपणे दिसेल अशा पद्धतीने पोस्टर/स्टँण्डी ठेवण्यात यावी.

*  ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्सच्या माध्यमातून करोना व्हायरस रोखण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? त्याबद्दल जनजागृती करण्यास सांगण्यात आले आहे.

*  बुट/चप्पल कारमध्येच ठेऊन प्रार्थनास्थळांमध्ये प्रवेश करावा.

*  पार्किंग लॉट आणि प्रार्थना स्थळांबाहेर सोशल डिस्टन्सिंग पाळून गर्दीचे व्यवस्थापन करावे.

*  मंदिराच्या बाहेर किंवा आत असलेली सर्व दुकाने, स्टॉल, कॅफेटेरियामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन झाले पाहिजे.

*  दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या रांगेचे व्यवस्थापन करताना योग्य अंतर राखण्यासाठी चिन्हांकन करावे. सोशल डिस्टन्सिंग पाळले गेलेच पाहिजे.

*  रांगेमध्ये सहा फुटाचे शारीरिक अंतर आवश्यक आहे.

*  प्रार्थनास्थळांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी भाविकांनी त्यांचे हात-पाय साबणाने स्वच्छ धुणे आवश्यक आहे.

*   पुरेसे सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल अशा पद्धतीने मंदिरात बसण्याची आसनव्यवस्था असली पाहिजे.

*   प्रार्थनास्थळांमध्ये मुर्ती, पवित्र ग्रंथांना स्पर्श करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

*   रेकॉर्डेड संगीत वाजवण्याची परवानगी असेल पण इन्फेक्शनचा धोका टाळण्यासाठी समूह गायनाला परवानगी नाकारण्यात आली आहे.

*  मंदिराने कॉमन अंथरी टाळावी त्याऐवजी भाविकांनी स्वत:सोबत येताना अंथरी किंवा कापड आणावे, जे जाताना ते आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतात.

* प्रसाद चढवणे किंवा त्याचे वाटप, पवित्र पाणी अंगावर शिंपडण्याला परवानगी नसेल.

* कम्युनिटी किचन, लंगर, अन्नदान फिजिकल डिस्टन्सिंग पाळून करता येईल.

Leave a Comment