24 वर्षांचा तरुण, 16 वर्षाची तरुणी; प्रेमीयुगुलाने सप्तश्रृंगी गडाच्या शीतकड्यावरून उडी घेत संपवले जीवन

नाशिक – सप्तशृंगी गडावरून (Saptshrungi gad) प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियांका संतोष तिडके (16), मंगेश राजाराम शिंदे (24) अशी आत्महत्या केलेल्या तरुण-तरुणीचे नावे आहेत.

सप्तश्रृंगी गडाच्या शीतकड्यावरून 400 फूट खोल दरीत उडी घेत त्यांनी आपले जीवन संपवले. हे तरुण-तरुणी गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता होते. आत्महत्येचे कारण उघडकीस आलेले नाही. 28 एप्रिलला दोघे दुचाकीवरून सप्तश्रृंगी गडावर गेले होते.

कुजलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह –

दोघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आले आहेत. घटनेनंतर आठवड्याभराने मृतदेह सापडले. गडाच्या पायथ्याला असणाऱ्या भातोडे येथील गुराख्यांनी याची माहिती पोलीस पाटील चव्हाण यांना दिली.

त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह दरीतून बाहेर काढून त्यांच्याजवळ असलेल्या साहित्यावरून त्यांची ओळख पटवण्यात आली आहे. त्यानंतर नातेवाईकांना माहिती देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.