नगर | भिंगार अर्बनच्या चेअरमनपदी झोडगे तर व्हाईस चेअरमनपदी चौधरी

नगर, (प्रतिनिधी)- भिंगार येथील भिंगार अर्बन को-ऑप बँकेच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत अनिलराव झोडगे व किसनराव चौधरी यांच्या नेतृत्वाखालील भृंगऋषी पॅनेलने यश संपादन केल्यानंतर आज बँकेच्या सभागृहात जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या चेअरमन व्हाईस चेअरमनपदाची निवडणुक झाली.

यामध्ये चेअरमनपदासाठी अनिलराव झोडगे यांच्या नावाची सूचना संचालक नामदेव लंगोटे यांनी मांडली, तर व्हाईस चेअरमनपदासाठी किसनराव चौधरी यांच्या नावाची सूचना राजेंद्र पतके यांनी मांडली, त्यास एकनाथराव जाधव यांनी अनुमोदन दिले. सर्वांनुमते ही निवड बिनविरोध करण्यात आली.

यावेळी बँकेचे संचालक विष्णू फुलसौंदर, अमोल धाडगे, राजेंद्र पतके, एकनाथ जाधव, नामदेव लंगोटे, तिलोत्तमा करांडे, अनिता भुजबळ, माधवराव गोंधळे, महेश झोडगे, रुपेश भंडारी, कैलास दळवी, कैलास रासकर आदिंसह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत महाजन, उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी अल्ताफ शेख उपस्थित होते.

यावेळी नवनिर्वाचित चेअरमन अनिलराव झोडगे व व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी यांचा जिल्हा उपनिबंधक है गणेश पुरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.

यावेळी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांचा चेअरमन अनिलराव झोडगे व व्हाईस किसनराव चौधरी यांनी सत्कार केला तर अल्ताफ शेख यांचा सत्कार अमोल धाडगे व विष्णू फुलसौंदर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव लंगोटे यांनी केले तर आभार विष्णू फुलसौंदर यांनी मानले.